भजनी मालिका
← भजनांकडे परत

चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे

chala jaun re samore | pudhen bheton viththal dhure

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥१॥ तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं । फेडावया धणी । प्रेमसुखाची आजी ॥ध्रु.॥ पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥२॥ आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥३॥