भजनी मालिका
← भजनांकडे परत

चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन

chakarivanchun | khanen anuchit vetan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन ॥१॥ धणी काढोनियां निजा । करील ये कामाची पूजा ॥ध्रु.॥ उचितावेगळें । अभिलाषें तोंड काळें ॥२॥ सांगे तरी तुका । पाहा लाज नाहीं लोकां ॥३॥