भजनी मालिका
← भजनांकडे परत

चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म

chahun ashramanche dharma | na rakhatan jode karma

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ॥१॥ तैसी नव्हे भोळी सेवा । एक भाव चि कारण देवा ॥ध्रु.॥ तपें इंद्रियां आघात । क्षणें एका वाताहात ॥२॥ मंत्र चळे थोडा । तरि धड चि होय वेडा ॥३॥ व्रतें करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥४॥ धर्म धर्मा सत्त्व चि कारण । नाहीं तरी केला सिण ॥५॥ भूतदयेसि आघात । उंचनिच वाताहात ॥५॥ तुका म्हणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥॥