भजनी मालिका
← भजनांकडे परत

चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका

chad ananyachi dhari narayan | apanasaman kari ranka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥ रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाहीं म्हुण ॥२॥ नसांपडे इंद्रचंद्रब्रम्हादिकां । अभिमानें एका तळिमात्रें ॥३॥ तळिमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥ भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥ दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥ यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजिलेंजे ॥७॥ जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥८॥ यमधर्म म्हणे तयां दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥९॥ चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हां कान डोळे मुख ॥१०॥ कान डोळे मुख संतांची संगति । न धरा च चित्ती सांगितलें ॥११॥ सांगितलें संतीं तुम्हां उगवूनि । गर्भासी येऊनि यमदंड ॥१२॥ दंडूं आम्हीं रागें म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥ दुर्जनाचा याणें करूनि संहार । पूर्णअवतार रामकृष्ण ॥१४॥ रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठी त्यां ॥१५॥