भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हज्ञान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं

bramhadnyan darin yeten kakulati | avherilen santin vishnudasin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रम्हज्ञान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं॥१॥ रिघों पाहे माजी बळें त्याचें घर । दवडिती दूर म्हणोनियां ॥२॥ तुका म्हणे येथें न चाले सायास । पडिले उदास त्याच्या गळां ॥३॥