भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में

bramhachari dharma ghokaven akshar | ashramin vichar shatakarmen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रम्हचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥१॥ वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥ध्रु.॥ परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळ नाहीं ॥२॥ बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥३॥ तुका म्हणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दुःख पावे ॥४॥