भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्ह न लिंपे त्या मळें । कर्माअकर्मा वेगळें

bramha na limpe tya malen | karmaakarma vegalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ब्रम्ह न लिंपे त्या मळें । कर्माअकर्मा वेगळें ॥१॥ तोचि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ध्रु.॥ शोच अशौचाचे संधी । तन आळा तना चि मधीं ॥२॥ पापपुण्यां नाहीं ठाव । तुका म्हणे सहज भाव ॥३॥