भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलोनियां काय दावूं । तुम्ही जीऊ जगाचे

boloniyan kay davun | tumhi jiu jagache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलोनियां काय दावूं । तुम्ही जीऊ जगाचे ॥१॥ हे चि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥ विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥२॥ तुका म्हणे पायापाशीं । येइन ऐसी वासना ॥३॥