भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं

bolayacha tyasin | nako sambandh manasin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥ जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥ जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥२॥ तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥