भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलविसी माझें मुखे । परी या जना वाटे दुःख

bolavisi majhen mukhe | pari ya jana vate duhkh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलविसी माझें मुखे । परी या जना वाटे दुःख ॥१॥ जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥ कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥ खाऊं नये तें चि मागे । निवारितां रडों लागे ॥३॥ वैद्या भीड काय । अतित्याई जीवें जाय ॥४॥ नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥५॥ धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥६॥ तुका म्हणे यांत । आवडे ते करा मात ॥७॥