भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे

bolalon ten kanhin tumachiya hita | vachan nenatan kshama kije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥ वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥ निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरी आंत चरे ॥२॥ तुका म्हणे हित देखण्यासी कळे । पडती आंधळे कूपामाजी ॥३॥