भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें

bolal ya atan apulyapuraten | maj ya ananten goviyelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥१॥ झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥ तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवें मिठी अंगसंगें ॥२॥ तुका म्हणे तुम्हां होईल हे परी । अनुभव वरी येईल मग ॥३॥