भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोधलिया अंजनासी पायाळू हा काय

bodhaliya anjanasi payalu ha kay

बोधलिया अंजनासी पायाळू हा काय । निधान जरी आहे परि शब्द नेणें ॥ परादिकां वाचां मौन पडिलें जाण । तेथें पायाळाची खुण कोण लेखी ॥१॥ सुखाचा संवाद आपण्यामाजी पाही । देहींचा देही विदेह होऊनि ठेला ॥२॥ अविकल्पवृत्ति भानु संकल्पें हा नातळे । कर्म तया न मिळे करिजे कोणे ॥ बापरखुमादेविवरु कर्ता कर्म न पडे कांहीं दृष्टि । वायांचि भ्रमें बांधलासी दृष्टि रया ॥३॥