भजनी मालिका
← भजनांकडे परत

बीजीं फळाचा भरंवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आशा । काकुलती ते नाड

bijin phalacha bharanvasa | jatan sinchanasarisa | chaviliya asha | kakulati te nad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बीजीं फळाचा भरंवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आशा । काकुलती ते नाड ॥१॥ हा तों गडसंदीचा ठाव । पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥ माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे सेजारीं । दुःख भ्रमें भोगीतसे ॥२॥ तुका म्हणे दिशाभुली । झाल्या उफराटी चाली । निवाड्याची बोली । अनुभवें साक्षीसी ॥३॥