भजनी मालिका
← भजनांकडे परत

बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ

bijapotin pahe phal | vidh na karitan sakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥ तया मूर्ख म्हणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥ध्रु.॥ दावितिया वाट । वेठी धरूं पाहे चाट ॥२॥ पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखे काया ॥३॥