भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो

bhyalin jiva chukalin deva | nahin thava javalin to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो ॥१॥ आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ध्रु.॥ जवळी होतां न कळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥२॥ तुका म्हणे हा लाघवी मोटा । पाहे खोटा खरा भाव ॥३॥