भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुंकुनियां सुनें लागे हत्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे

bhunkuniyan sunen lage hattipathi | houni himputi duhkh pave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भुंकुनियां सुनें लागे हत्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥१॥ काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ध्रु.॥ मातलें माकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तेंणे ॥२॥ तुका म्हणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करूनियां ॥३॥