भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना

bhumi avaghi shuddha jana | amangal he vasana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥ तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥ जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥ तुका म्हणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥