भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रमना पाउलें वेचताती तीं वाव । प्रवेशतां ठाव एक द्वार

bhramana paulen vechatati tin vav | praveshatan thav ek dvar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भ्रमना पाउलें वेचताती तीं वाव । प्रवेशतां ठाव एक द्वार ॥१॥ सार तीं पाउलें विठोबाचीं जीवीं । कोणीं न विसंभावीं क्षणभरि ॥ध्रु.॥ सुलभ हें केलें सकळां जीवन । फुंकावें चि कान न लगेसें ॥२॥ तुका म्हणे येथें सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचें ॥३॥