भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोंवरी सांडुनि पाव ठेविरे गोपाळा

bhonvari sanduni pav thevire gopala

भोंवरी सांडुनि पाव ठेविरे गोपाळा । नाच चिदानंदा सुख होईल सकळां ॥१॥ रंगु रंगलारे रंगु रंगलारे । आदि मध्य अंत त्रिगुणविरहित विश्वीं प्रकाशलारे ॥ध्रु०॥ रंगु रंगला सुरंग जाला । पहिलीये रंगी निवृत्ति भला ॥२॥ सुखीं सुख मुरे प्रेमें चिदानंद उरे । बापरखुमादेविवरु विठ्ठलुरे ॥३॥