भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोळ्या भाविकांसी सांपडले वर्म

bholya bhavikansi sampadale varma

रचनाकार: संत बंका · अभंग
भोळ्या भाविकांसी सांपडले वर्म । सुलभ हें नाम विठोबाचें ॥१॥ भवाचा उतार हरिनाम सांगडी । जाऊं पैलथडी हेळामात्रें ॥२॥ आनंद सोहळा हरिकथा माउली । भाविकां वोळली प्रेमपान्हा ॥३॥ वंका म्हणे माझ हाचि निर्धार । येणे संसार देशधडी ॥४॥