भजनी मालिका
← भजनांकडे परत

भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा

bhitari gele hari raha kshanabhari | hoil phal dhir karava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥१॥ न करीं त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ध्रु.॥ करूनी मर्दन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥२॥ नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥३॥ करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥४॥ तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होती चित्ती ॥५॥