भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाठी

bhetivanchoniyan dujen nahin chittin | yenen kakulati yajasathi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाठी ॥१॥ भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥ मायलेकरासीं नाहीं दुजी परि । जेऊं बरोबरी बैसोनियां ॥२॥ तुका म्हणे ऐसें अंतरींचें आर्त । यावें जी त्वरित नारायणा ॥३॥