भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटि जाली धुरेसी

bheti jali dhuresi

भेटि जाली धुरेसी । पालटु जाला या जीवासी । लोहो लागलें परिसेसीं । तें सुवर्ण जालें । ऐसा गुणागुणाचा दाता । तो विश्व व्यापिलेरे अनंता । काय पाहतोसि आतां । विमानीं वाट पाहातुसें ॥१॥ तरि मी गुंतलों दातारा । येऊनियां संसारा ॥ध्रु०॥ नट घेऊनियां अंगवणीं । वरुं नेणे संपादणी । एकत्र जालें लवण पाणी । तें मिळोनी गेलें । ऐसा बहुतां गुणांचा दाता । तो विश्व व्यापिलें रे अनंता । काय बा पाहातोसि आतां आपुल्या सारिखें करी बापा ॥२॥ चंद्र वेंचितासि खडे । परिस म्हणोनि ठेविसी । आतां असो हा गाडोरा । शरण रिघे रखुमादेविवरा । अरे अरे विठोजी दातारा । नवजे घरा आणिकांच्या ॥३॥