भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेद तुटलियावरी । आम्ही तुमचीं च हो हरी

bhed tutaliyavari | amhi tumachin cha ho hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भेद तुटलियावरी । आम्ही तुमचीं च हो हरी ॥१॥ आतां पाळावे पाळावे । आम्हां लडिवाळांचे लळे ॥ध्रु.॥ आणिकांची देवा । नाहीं जाणत चि सेवा ॥२॥ तुका म्हणे हेवा । माझा हेत पायीं देवा ॥३॥