भजनी मालिका
← भजनांकडे परत

भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव

bhay nahin bhev | anutapin navhatan jiv

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥१॥ जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥ उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥२॥ तुका म्हणे चित्त । होय आवडी मिश्रित ॥३॥