भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति

bhavevin bhakti bhaktivin mukti

भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया ॥२॥ सायास करिसी प्रपंच दिननिशीं । हरीसी न भजती कोण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि जप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥