भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावाचिया बळें । आह्मी निर्भर दुर्बळें

bhavachiya balen | ahmi nirbhar durbalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भावाचिया बळें । आह्मी निर्भर दुर्बळें ॥१॥ नाहीं आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ता ॥ध्रु.॥ तर्का नाहीं ठाव । येथें रिघावया वाव ॥२॥ एकछत्रीं राज । तुक्या पांडुरंगीं काज॥३॥