भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावाचेनि बळें घेतलें वैकुंठ

bhavacheni balen ghetalen vaikunth

भावाचेनि बळें घेतलें वैकुंठ । हरिनाम नीट वैकुंठ मार्ग ॥१॥ सोपें हो साधन साधावया लागी । नलगे उपाधि नाना मते ॥२॥ ज्ञानें सहित ज्ञान विज्ञानेसि धन । वृत्तीचें समाधान निवृत्ति करी ॥३॥ शांति दया क्षमा करुणानिधी प्रेमा । नेऊनि परब्रह्म भावें मिळती ॥४॥ ज्ञानदेवो सांगे भावो मिनला गंगे । सुस्त्रात सर्वांगें हरी गंगा ॥५॥