भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत

bhav devachen uchit | bhav tochi bhagavant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥ धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥ बहुत बराडी । देवा वरी आवडी ॥२॥ तुका म्हणे हें रोकडें । लाभ अधिकारी चोखडे ॥३॥