भजनी मालिका
← भजनांकडे परत

भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें

bharavahi nolakhati ya ananta | javali asatan angasangen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥ अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥ मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धी स्थिर ॥३॥ बुद्धी स्थिर राहो नेदी नारायण । आशाबद्ध जन लोभिकांची ॥४॥ लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका म्हणे तेणें दुःखी होती ॥५॥