भजनी मालिका
← भजनांकडे परत

भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित

bhandaven ton hit | thayi pada ten uchit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥१॥ नये खंडों देऊं वाद । आम्हां भांडवलभेद ॥ध्रु.॥ शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥२॥ तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नास ॥३॥