भजनी मालिका
← भजनांकडे परत

भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हेचि

bhandaval majhen latikyache ganthi | udim to tuti yavi hechi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हेचि ॥१॥ कैसी तुझी वाट पाहों कोण्या तोंडें । भोंवतीं किं रे भांडे गर्भवास ॥ध्रु.॥ चहूं खाणीचिया रंगलोंसें संगें । सुष्ट दुष्ट अंगें धरूनियां ॥२॥ बहुतांचे बहु पालटलों सळे । बहु आला काळें रंग अंगा ॥३॥ उकलूनि नये दावितां अंतर । घडिचा पदर सारूनियां ॥४॥ तुका म्हणे करीं गोंवळयासाठी । आपल्या पालटीं संगें देवा ॥५॥