भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिसुख नाहीं आले अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करूं

bhaktisukh nahin ale anubhava | to mi dnyan deva kay karun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तिसुख नाहीं आले अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करूं ॥१॥ नसावे जी तुह्मी कांहीं निश्चिंतीने । माझिया वचने अभेदाच्या ॥ध्रु.॥ एकाएकीं मन नेदी समाधान । देखिल्या चरण वांचूनियां ॥२॥ तुका म्हणे वाचा गुणीं लांचावली । न राहे उगली मौन्य मज ॥३॥