भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सळे । विठ्ठले कृपाळे होसी माये

bhaktipratipale din vo vatsale | viththale krupale hosi maye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सळे । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥ पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥२॥ तुका म्हणे माझें जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देई ॥३॥