भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ती ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी

bhakti jyachi thodi | purna vishayanchi godi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्ती ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥१॥ तो नर चि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ध्रु.॥ भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥२॥ तुका म्हणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥३॥