भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ती देवाघरचा सुना । देव भक्तचा पोसणा

bhakti devagharacha suna | dev bhaktacha posana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्ती देवाघरचा सुना । देव भक्तचा पोसणा ॥१॥ येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥ देव भक्तची कृपाळु माता । भक्ती देवाचा जनिता ॥२॥ तुका म्हणे अंगें । एक एकाचिया संगें ॥३॥