भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांहून देवा आवडते काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें

bhaktanhun deva avadate kai | tribhuvanin nahin an dujen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्तांहून देवा आवडते काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥१॥ नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥ध्रु.॥ सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें ॥२॥ सर्वस्वें त्याचा म्हणवी विकिला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥३॥ तुका म्हणे भक्तीसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं ॥४॥