भजनी मालिका
← भजनांकडे परत

भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी

bhajan ghali bhogavari | akartavya manin dhari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥१॥ धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥ नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जावें आस ॥२॥ हें ना तैसे जालें । तुका म्हणे वांयां गेलें ॥३॥