भजनी मालिका
← भजनांकडे परत

भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्ती हेवा दुजा कांहीं

bhajalya gopika sarva bhaven deva | nahin chitti heva duja kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्ती हेवा दुजा कांहीं ॥१॥ दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥ ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥३॥ भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकळिक मथुरेचे ॥४॥ मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥५॥ राज्य करी गोपीयादवांसहित । कमिऩलें बहुतकाळ तेथें ॥६॥ तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥