भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची

bhagyavanta he paravadi | kariti jodi janmachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥ आपुलाला लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥ इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥२॥ तुका म्हणे आल्या थोऱ्या । वस्तु बऱ्या मोलाच्या ॥३॥