भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय

bhagyacha uday | te he jodi santapay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥ येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥ होई बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥२॥ तुका आला लोटांगणीं । भक्तीभाग्या जाली धणी ॥३॥