भजनी मालिका
← भजनांकडे परत

भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ

bhagaven tari shvan sahaj vesh tyacha | tethen anubhavacha kay panth

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥१॥ वाढवुनी जटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥ध्रु.॥ कोरोनियां भूमी करिती मधीं वास । तरी उंदिरास काय वाणी ॥२॥ तुका म्हणे ऐसें कासया करावें । देहासी दंडावें वाउगें चि ॥३॥