भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरे देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों

bare deva kunabi kelon | nahin tari dambhenchi asaton melon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरे देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥ भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥ विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥ सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥ गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥ तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥