भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य झाली बुद्धी संचितासी

baravi he vel sampadali sandhi | sahya jhali buddhi sanchitasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य झाली बुद्धी संचितासी ॥१॥ येणें पंथें माझीं चालिलीं पाउलें । दरुषण झालें संतां पायीं ॥ध्रु.॥ त्रासिलें दरिद्रें दोषा झाला खंड । त्या चि काळें पिंड पुनीत झाला ॥२॥ तुका म्हणे झाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥३॥