भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवें देशाउर जालें । काय बोलें बोलावें

baraven deshaur jalen | kay bolen bolaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरवें देशाउर जालें । काय बोलें बोलावें ॥१॥ लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥ भाग्यें जाली संतभेटी। आवडी पोटीं होती ते ॥२॥ तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥३॥