भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवें बरवें । केलें विठोबा बरवें

baraven baraven | kelen vithoba baraven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरवें बरवें । केलें विठोबा बरवें ॥१॥ पाहोनि आंत क्षमा । अंगी कांटीवरी मारविलें ॥ध्रु.॥ शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटंबिलें ॥२॥ तुका म्हणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतलें रे ॥३॥