भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवा बरवा बरवा देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं

barava barava barava deva tun | jivahuni avadasi jiva re deva tun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरवा बरवा बरवा देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥१॥ पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥ अष्टै अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वर्णितां लक्षण रे देवा ॥२॥ मन जालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥३॥