भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाप मेला न कलता । नव्हती संसाराची चिंता

bap mela na kalata | navhati sansarachi chinta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाप मेला न कलता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥ विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसर्याचेचें काज ॥ध्रु.॥ बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥२॥ पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥३॥ माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥