भजनी मालिका
← भजनांकडे परत

बळियाचे अंकित । आम्ही झालों बळिवंत

baliyache ankit | amhi jhalon balivant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बळियाचे अंकित । आम्ही झालों बळिवंत ॥१॥ लाता हाणोनि संसारा । केला षड ऊर्मीचा मारा ॥ध्रु.॥ जन धन तन । केलें तृणाही समान ॥२॥ तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥